ICHMH51NEWS.IN
9921600800

प्रेरणा परिवार गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक – भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्रेरणा परिवार गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक – भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम

इचलकरंजी (प्रतिनिधी):

इचलकरंजी शहरातील प्रेरणा परिवार गणेशोत्सव मंडळाचा विसर्जन सोहळा यंदा भव्य आणि अविस्मरणीय ठरला. ४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री आठ वाजता पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीची सुरुवात झाली. टाळ-टाळ, ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीतांचे स्वर आणि “गणपती बाप्पा मोरया” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांनी पांडुरंग-रुक्मिणी यांच्या प्रतिमा घेऊन मिरवणुकीचे नेतृत्व केले. या दृश्यामुळे उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.
प्रेरणा महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक नऊवारी साड्यांमध्ये सजून टाळ-चिपळ्यांच्या तालावर भजनी गाणी गात सहभाग नोंदवला. लता मंद्रे, नेहा शिंदे, गीता फातले, वैशाली मोहिते, कल्याणी हावळ, नकुशा रानभरे, प्रिया हावळ, आरती बडवे, ज्योती बडवे, गीता ठोंबरे, धनश्री ठोंबरे, ज्योती भोंगे, सुरेखा पेटकर, मीनाक्षी पिसे, निलम बोगाळे, योगिता रासम, मनिषा काजवे, श्रद्धा काजवे, मेघा माळी, आशा मारवाडी (साळी), सुमन वनारसे आदींचा सहभाग विशेष लक्षणीय ठरला. त्यांच्या भजन-कीर्तनामुळे संपूर्ण मिरवणूक भक्तिमय रंगात रंगली.

मंडळाचे अध्यक्ष ईश्वर पेटकर, उपाध्यक्ष शुभम पिसे, खजिनदार अनिकेत फातले, सेक्रेटरी गजेंद्र हावळ यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीचे शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले. पंचगंगा घाटावर विसर्जन
ढोल-टाळांच्या तालावर, भक्तिगीतांच्या स्वरात गणपती बाप्पाचे विसर्जन पंचगंगेच्या घाटावर करण्यात आले. संजय रासम, विनय वनारसे, सुनील बडवे, अविनाश वनारसे, किरण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विधी पार पडला. “गणपती बाप्पा मोरया – पुढच्या वर्षी लवकर या” या गजरात भक्तांच्या डोळ्यांत अश्रू तर ओठांवर आनंद होता.
लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मिरवणूक अविस्मरणीय केली. भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा सुंदर संगम झाल्याने प्रेरणा परिवाराचा हा विसर्जन सोहळा नागरिकांच्या मनात कायमची छाप सोडून गेला.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा