महाविकास आघाडी इचलकरंजीत सत्तेत पोहचणार – प्रभाग रचनेवर समाधान
इचलकरंजी :
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभाग व निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार इचलकरंजी महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर झाली. ११ ऑगस्ट २०२५ रोजी महानगरपालिका प्रशासनाने शासनाकडे हा आराखडा दाखल केला होता.
सदर प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर शहरात ती सत्ताधाऱ्यांच्या सोयीची असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या रचनेचा आढावा घेतल्यावर महाविकास आघाडीच्या दृष्टीकोनातून ही रचना अनुकूल ठरली असून आगामी निवडणुकीनंतर महाविकास आघाडी निश्चितच सत्तेत पोहचेल, असा विश्वास आघाडीच्या प्रमुखांनी व्यक्त केला.महाविकास आघाडीच्या प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रभाग रचनेवर समाधान व्यक्त करण्यात आले. येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदारांचा विश्वास संपादन करून आघाडी प्रबळ शक्ती म्हणून उभी राहील, असा ठाम विश्वास बैठकीत नोंदविण्यात आला.या बैठकीस महाविकास आघाडीचे प्रमुख मदन कारंडे, शशांक बावचकर, सागर चाळके, संजय कांबळे, राहुल खंजिरे, सयाजी चव्हाण, प्रकाश मोरबाळे, अब्राहम आवळे, सदा मलाबादे, हारून खलिफा, शिवाजी साळुंखे, सुनील बारवाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रभाग रचना आणि महाविकास आघाडीचा आत्मविश्वास शहरात नवा राजकीय रंग भरत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







