कु. भाग्यश्री रायकरचे डी.के.ए.एस.सी. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे शिवाजी विद्यापीठ गुणवत्तायादीत यश
इचलकरंजी:
दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. भाग्यश्री रामचंद्र रायकर हिने हिंदी विषयात शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्तायादीत स्थान मिळवून महाविद्यालयाचा मान वाढविला आहे. या यशाबद्दल तिचा प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. खाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व अभिनंदनपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान, महाविद्यालयातील हिंदी पदव्युत्तर विभागात अतिथी व्याख्याता म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. विठ्ठल नाईक यांना मुंबई हिंदी प्रचार सभेचा शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचाही गौरव प्राचार्य डॉ. खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांनी दोन्ही सत्कारमूर्तींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सकाळ सत्र प्रमुख प्रा. विजय पाटील, दुपार सत्र प्रमुख प्रा. डी. ए. यादव, मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ. सुभाष जाधव, हिंदी विभाग प्रमुख प्रा. निलेश जाधव, प्रा. अपर्णा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800