ICHMH51NEWS.IN
9921600800

डी के ए एस सी महाविद्यालयाच्या बॅडमिंटन संघाची उत्कृष्ट कामगिरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डी के ए एस सी महाविद्यालयाच्या बॅडमिंटन संघाची उत्कृष्ट कामगिरी

इचलकरंजी:
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शासकीय बॅडमिंटन स्पर्धा व्यंकटराव हायस्कूल व ज्युनि. कॉलेज इचलकरंजी या ठिकाणी उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाल्या.
या झालेल्या स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील गटामध्ये डी के ए एस सी महाविद्यालयाच्या बॅडमिंटन संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. पहिल्या दोन सामन्यात अनुक्रमे व्यंकटराव ज्युनि. कॉलेज व डी के टी ई कॉलेज यांच्यावर विजय प्राप्त करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर अंतिम सामन्यात तात्यासाहेब मुसळे कॉलेजचा सरळ 2 गेम मध्ये पराभव करत या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
संघातील खेळाडू अपूर्व दवडते, मोहित कांबळे, सुभान सनदी, प्रथमेश कोष्टी व आयुष बुचडे यांनी  केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे या बॅडमिंटन संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
खेळाडूंच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के खाडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.विनायक भोई, प्रा. मुजफ्फर लगीवाले यांचे मार्गदर्शन लाभले.  महाविद्यालयाचा प्राध्यापक स्टाफ, प्रशासकीय स्टाफ व विद्यार्थी विद्यार्थिनींनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बॅडमिंटन संघाचे अभिनंदन करताना प्राचार्य एस के खाडे
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा