ICHMH51NEWS.IN
9921600800

अनंतच तुर्दशीला माय फाउंडेशन तर्फे जलसेवा व २० हजाराहून अधिक कापसी बोळ्यांचे वाटप

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अनंतच तुर्दशीला माय फाउंडेशन तर्फे जलसेवा व २० हजाराहून अधिक कापसी बोळ्यांचे वाटप

इचलकरंजी:

अनंत चतुर्दशीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे माय फाउंडेशन तर्फे भाविकांसाठी “माय-जल सेवा” उपक्रम राबविण्यात आला. विसर्जनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या सेवेसाठी पिण्याच्या पाण्याचे स्टॉल लावण्यात आले होते.

तसेच डॉल्बी वाजण्यामुळे होणारा आवाजाचा त्रास टाळण्यासाठी व लहान मुले, महिला, वयोवृद्ध नागरिकांच्या कानांचे संरक्षण व्हावे, यासाठी यंदाही कापसी बोळ्यांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या वेळी २० हजारांहून अधिक कापसी बोळे भाविकांना देण्यात आले.

सामाजिक उपक्रमांतून जनजागृती आणि सेवाभाव जोपासत असलेल्या माय फाउंडेशनच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा