गणेशोत्सव शिल्लक रक्कम ‘अन्नदान श्रेष्ठदान’ उपक्रमास भेट : न्यू गणेश तरुण मंडळाचा उपक्रम
इचलकरंजी :
वस्त्रनगरीत जनजागृतीपर देखावे सादर करणारे न्यू गणेश तरुण मंडळ,सम्राट अशोकनगर यांनी यंदाही आपल्या सामाजिक भानातून वेगळा उपक्रम राबवला आहे. यावर्षी मंडळाने वाहतुकीचे नियम पाळा या संदेशावर आधारित प्रबोधनात्मक देखावा उभारला होता. शहरवासीयांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गणेशोत्सवासाठी जमा झालेल्या वर्गणीतून शिल्लक रक्कम मंडळाने इचलकरंजी नागरिक मंच संचलित ‘अन्नदान श्रेष्ठदान’ या उपक्रमाला भेट स्वरूपात दिली. इनाम तर्फे गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात असून, त्याद्वारे रोज ५० गरजू नागरिकांना दोन वेळचे जेवण पोहोचवले जाते.
लोकमान्य टिळकांनी अपेक्षित केलेल्या समाजप्रबोधन व लोकसेवेच्या संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या या मंडळाचे शहरभर कौतुक होत आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याकडून मदतनिधी इनाम सदस्यांकडे सुपूर्त करण्यात आला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







