ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी उपविभागात महसूल लोक अदालत : प्रलंबित दाव्यांच्या निपटाऱ्याची संधी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी उपविभागात महसूल लोक अदालत : प्रलंबित दाव्यांच्या निपटाऱ्याची संधी

इचलकरंजी:
मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार व विधी सेवा प्राधिकरण कायदा १९८७ मधील कलम १५ अन्वये महसूल लोक अदालतीचे आयोजन इचलकरंजी उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. या लोक अदालतीत हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील प्रलंबित महसूली दावे तडजोडीने निकाली काढण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.

महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून दोन्ही पक्षकारांनी सक्रिय सहभाग घेतल्यास कमी कालावधीत व कायमस्वरूपी निकाल मिळणे शक्य होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन सुलभतेने न्याय मिळू शकेल, असे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात जिल्हा तसेच तालुका बार असोसिएशनमार्फत सर्व विधिज्ञांना अवगत करण्यात आले असून, संबंधित पक्षकारांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या पक्षकारांना तडजोड करावयाची आहे त्यांनी अथवा त्यांच्या विधिज्ञांमार्फत “नमुना अ” या विहीत नमुन्यात तडजोडनामा अर्ज दिनांक १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय, इचलकरंजी येथे सादर करावा.

प्राप्त अर्जाची छाननी करून नियोजित दिवशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्यात येईल व दोन्ही पक्षकारांच्या खात्रीने तडजोडनामा तयार करून प्रलंबित महसूली दावे निकाली काढले जातील.

उपविभागातील सर्व पक्षकार व विधिज्ञांनी या महसूल लोक अदालतीत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा