ICHMH51NEWS.IN
9921600800

कन्या महाविद्यालयामध्ये शिक्षकदिन उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कन्या महाविद्यालयामध्ये शिक्षकदिन उत्साहात संपन्न

इचलकरंजी :

येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील
कन्या, महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांनी शिक्षकाची भूमिका निभावताना विदयार्थी म्हणून अंतर्मुख होणे गरजेचे असते.  तसेच महाविदयालायाचे व्यवस्थापन कसे चालते याची माहिती विद्यार्थ्यांना मिळत असते. विद्यार्थी व शिक्षक हे शिक्षण प्रक्रियेतील एकाच नाण्याच्या बाजू आहेत. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी  शिक्षक हा मार्गदर्शक रूपी दुआ आहे. देशाच्या विकासासाठी सुजाण नागरिक निर्माण करणे हेच प्रत्येक शिक्षकाचे देश निर्माता म्हणून महत्त्वाची भूमिका असते असे मत मांडले.
याबरोबरच अनेक विद्यार्थीनींनी इ.११ पासून B.A. / B.com वर्गाचे तास उत्साहात घेत शिक्षकाची भूमिका निभावली. यासाठी विद्यार्थीनींनी प्राचार्या, उपप्राचार्य, शिक्षक, क्लार्क, शिपाई अशा सर्वच स्तरावर काम केले. विद्यार्थी प्राचार्य म्हणून कु. दिव्या बिरंगे तर उपप्राचार्य कु. स्वानंदी तोरणे यांनी शिक्षक होणे सोपे नाही, शिक्षक हा महत्वाचा घटक समाज घडवत असतो. त्यामुळे चांगला गुरु भेटणे गरजेचे आहे अशा शब्दात अनुभव कथन केले.
या प्रसंगी कु. राधिका शिंदे, कु. सायली देसाई, कु. भक्ती काजवे, कु. सानिया शेख, कु. वसुंधरा कबनुरकर, कु. सिध्देश्वरी पाटील, कु. सलोनी मडीवाळ यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौं. एकता जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ.विठ्ठल नाईक यांनी केले. या प्रसंगी डॉ. प्रियांका कुंभार, प्रा. स्वाती हळवणकर, प्रा. प्रियांका साळुखे, प्रा. दत्तात्रय घाटगे, प्रा. सप्नील बगाडे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आभार कु. ऋतुजा चौगले हिने मानले.

शिक्षकदिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ बाबासाहेब दुधाळे

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा