ICHMH51NEWS.IN
9921600800

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी:

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दहावीच्या सर्व विद्यार्थिनींनी शिक्षक, शिपाई, कर्मचारी, लिपीक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा परिचर, संगणक परिचर, पर्यवेक्षिका, उपमुख्याध्यापिका व मुख्याध्यापिका अशा सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.

या उपक्रमात इ. १० वी अ मधील वृद्धी काकडे हिने मुख्याध्यापिका म्हणून दिवसभराचे कामकाज पाहिले, तर सुषमा चिखले (१० वी ड), वैष्णवी आगरकर (१० वी ब), श्रावणी मस्के (१० वी क) यांनी पर्यवेक्षिका म्हणून कामकाज केले. विद्यार्थिनी शिक्षिकांनी एकूण पाच तासिका अध्यापन केले. यासाठी त्यांना ८ सप्टेंबर रोजी तासिकेचे नियोजन व मार्गदर्शन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी वेळापत्रक तयार करून देण्यात आर. एम. गरड सर यांनी सहकार्य केले, तसेच विषयवार मार्गदर्शन सर्व शिक्षकांनी केले.

मुख्य कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. विद्यार्थिनी मुख्याध्यापिका वृद्धी काकडे हिने स्वागत व प्रास्ताविक केले. विद्यार्थिनी उपमुख्याध्यापिका सुषमा चिखले, पर्यवेक्षिका वैष्णवी आगरकर, श्रावणी मस्के तसेच शिक्षिका उमल कसेकर, श्रद्धा लवटे, तन्वी चौगुले, जिया मुजावर यांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका ए. एस. काजी होत्या. त्यांनी शिक्षकांचे स्थान, त्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यातील योगदान याबद्दल मार्गदर्शनपर विचार व्यक्त करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते विद्यार्थिनी पदाधिकारी, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

शेवटी आभार प्रदर्शन विद्यार्थिनी पर्यवेक्षिका श्रावणी मस्के हिने केले. सूत्रसंचालन इंद्रायणी जाधव व पूर्वा चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाला ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी, पर्यवेक्षिका व्ही. एस. लोटके, पर्यवेक्षक एस. एस. कोळी, विभाग प्रमुख श्रीमती एस. एस. शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शिक्षकदिन साजरा करताना शिक्षक स्टाफ व विद्यार्थीनी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा