इमनपाची कारवाई; ज्ञानगंगा एज्यु. सोसायटीचे अतिक्रमण हटवले.
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर करण्यात आलेले ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीचे अतिक्रमण आज महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात हटवून भूखंड ताब्यात घेतला.
जुना चंदूर रोड, दुर्गामाता मंदिराजवळील रिव्हिजन सर्व्हे नंबर ४०७, हिस्सा क्र. १अ या खुल्या भूखंडावर सदर अतिक्रमण करण्यात आले होते. महापालिका आयुक्त सौ. पल्लवी पाटील, उपायुक्त नंदू परळकर व सहायक आयुक्त विजय राजापुरे यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान काहीसा विरोध व किरकोळ वादविवाद झाले.
नगररचना विभागातील सहा. नगररचनाकार अविनाश बन्ने, हरीशचंद्र पाटील, अमरजित लकडे, भूमापक अनिल सुतार, सावकार चौगुले, मिळकत विभाग अधीक्षक श्रीकांत पाटील, वरिष्ठ लिपिक सदाशिव गोनुगडे, लिपिक अनिल पाटील, कोर्ट विभाग विधी अधिकारी अॅड. भावना देवडा, वरिष्ठ लिपिक कृष्णा आवळे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांच्यासह महानगरपालिकेच्या अन्य कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
अतिक्रमण हटवून भूखंड ताब्यात घेताना मनपा अधिकारी व कर्मचारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








