कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक ‘सर्वोत्कृष्ठ बँक’ पुरस्काराने सन्मानित-चेअरमन स्वप्निल आवाडे
इचलकरंजी
राष्ट्रीय नागरी सह. वित्त विकास महामंडळ (NUCFDC) मुंबई, या महामंडळाकडून, इचलकरंजी स्थित कल्लाप्पाण्ण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेस ‘सर्वोत्कृष्ठ बँकेचा’ पुरस्कार देवून सन्मानित करणेत आले. सदरचा पुरस्कार, राष्ट्रीय नागरी सह. वित्त विकास महामंडळ (NUCFDC) मुंबई या महामंडळाचे अध्यक्ष श्री ज्योतिंद्रभाई मेहता यांचे शुभहस्ते व आमदार प्रविण दरेकर, महाराष्ट्र राज्य बँक्स् फेडरेशनचे अध्यक्ष श्री अजय ब्रम्हेचा, उपाध्यक्षा सौ. वैशाली आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करणेत आला.
समाजातील सर्वच स्तरातील घटकांना आर्थिक मदतीचा हात देवून, त्यांचा उद्योग व्यवसाय विकसीत करणे, सर्वसामान्यांच्या अडीअडचणींचे तात्काळ निर्मुलन करणे या उदात्त हेतूने, १९६३ साली स्थापन झालेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेने, संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये ५४ शाखांच्या माध्यमातून शाखा विस्तार करून, जनसामान्यांच्या आर्थिक हितास कटिबध्द राहून, जनमानसात बँक लोकाभिमुख झाली व सहकारी बँकींग क्षेत्रात एक आदर्श बँक म्हणून नावारूपास आली आहे. याचेच प्रतिक म्हणून आज बँकेस सहकारी बँकींग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ठ बँक म्हणून गौरविण्यात आले आहे असे प्रतिपादन बँकेचे चेअरमन श्री स्वप्निल आवाडे यांनी या प्रसंगी केले.
राष्ट्रीयकृत व खाजगी बँका त्यांच्या ग्राहकांना ज्या आर्थिक सुविधा देत आहे त्या सर्व सुविधा कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या ग्राहकांना देण्यासाठी बँक नेहमी अग्रभागी आहे व अत्याधुनिक सर्व सुविधा बँक ग्राहकांना देत आहे. बँकेचा ग्राहक हा केंद्रबिंदू मानून, त्यांच्या आर्थिक अडचणींचे निराकरण करणे, उद्योगधंदयांना चालना देणे, व्यापाऱ्यांना त्यांचा व्यापार वर्धिष्णू करणेस सर्वतोपरी आर्थिक सहकार्य करणे, सौहार्दपूर्ण सेवा देणे, अद्ययावत तांत्रिक सुविधा देणे या व यासारख्या अनेक सुविधांच्या माध्यमातून बँकेने सर्वसामान्यांच्या मनामध्ये आदराचे स्थान निर्माण करून, ग्राहक व बँक यांच्यातील अतूट धाग्याच्या गुंफनामुळे, बँक सहकारी बँकींग क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ठ बँक म्हणून नावारूपास आलेली आहे याचा मला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन बँकेचे चेअरमन श्री स्वप्निल आवाडे यांनी सदर प्रसंगी केले व येथून पुढील काळातही बँक सर्वसामान्यंच्या आर्थिक हितास कटिबध्द राहून, त्यांच्या विकासासाठी अविरतपणे कार्यरत राहील असा विश्वास व्यक्त केला.
सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य बँक्स् असोसिएशनचे सर्व संचालक, बँकेचे व्हा. चेअरमन सीए श्री संजयकुमार अनिगोळ, व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे चेअरमन सीए श्री चंद्रकांत चौगुले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय शिरगावे, काळबादेवी मुंबई क्लस्टर हेड श्री संतोष सावंत तसेच विविध सहकारी बँकांचे पदाधिकारी व अधिकारी सदर पुरस्कार सोहळयास उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







