डी के ए एस सी महाविद्यालयाच्या मल्लखांब खेळाडूंचे यश
इचलकरंजी:
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शासकीय मल्लखांब खेळाच्या स्पर्धा डी के टी ई इंग्लिश मीडियम स्कूल इचलकरंजी या ठिकाणी उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाल्या.
या झालेल्या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या मल्लखांब खेळाडूंनी अद्वितीय कसरती सादर केल्या. यामुळे श्रुती मांगलेकर द्वितीय क्रमांक, केतकी बोनगे तृतीय क्रमांक, अनुष्का चिरमुठे चतुर्थ क्रमांक व विद्या इक्कळी पाचवा क्रमांक प्राप्त केला. त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे या सर्व खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
Advt
खेळाडूंनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के खाडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.विनायक भोई, प्रा. मुजफ्फर लगीवाले व प्रबंधक श्री आर बी जोग यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचा प्राध्यापक स्टाफ, प्रशासकीय स्टाफ व विद्यार्थी विद्यार्थिनींनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मल्लखांब स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा सन्मान करताना प्राचार्य खाडे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







