इचलकरंजीत हवामान-सहिष्णु सेवांसाठी “Community-led Nature-Based Solutions” प्रकल्पाचा शुभारंभ
इचलकरंजी :
CEPT University आणि इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने, HSBC च्या CSR अनुदानातून “Community-led Nature-Based Solutions for Climate Resilient Services in Low-Income Areas of Ichalkaranji” या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन व करारपत्र स्वाक्षरी मंगळवारी (दि.१६ सप्टेंबर) पार पडली. ‘माझी वसुंधरा अभियान’ राज्य संचालक मा. सुधाकर बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियान ६.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने कमी उत्पन्न गटातील भागांमध्ये शाश्वत जलव्यवस्था, शहरी पुरनियंत्रण, पावसाचे पाणी संकलन व भूमिगत जलसंचय यांसाठी समुदायाच्या सहभागातून हवामान-सहिष्णु WASH सेवा उभारण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे भविष्यात इचलकरंजीत जलसुरक्षा निर्माण होऊन नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Advt
या प्रसंगी माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.घरगुती गणेशोत्सव विजेते – प्रथम : किरण काकडे, द्वितीय : अर्चित जोशी, तृतीय : प्रियांका नाईक.सार्वजनिक गणेशोत्सव विजेते – प्रथम : श्री छत्रपती गणेशोत्सव मंडळ, द्वितीय : आदर्श विद्यामंदिर, तृतीय : ऋतुराज कॉलनी.यांना बक्षिस प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, विद्या कदम, CEPT University चे प्रो. दिनेश मेहता व प्रो. मीरा मेहता, HSBC India चे रोमित सेन, CWAS चे आसिम मन्सुरी व अर्वा भारमल यांसह महानगरपालिकेचे विभागप्रमुख, अधिकारी व विजेते स्पर्धक कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कराराप्रसंगी महापालिका आयुक्त व CEPT युनिव्हर्सिटीचे पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







