ICHMH51NEWS.IN
9921600800

दत्ताजीराव कदम कॉलेजमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दत्ताजीराव कदम कॉलेजमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी (प्रतिनिधी):
दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी येथे सोमवार दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात प्रो.डॉ.सुपर्णा संसुद्धी, (जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर) यांनी “आधुनिक हिंदी साहित्य” या विषयावर अत्यंत उद्बोधक व विचारप्रवर्तक व्याख्यान दिले. त्यांनी आधुनिक हिंदी साहित्याची प्रवृत्ती, विविध साहित्यिकांचे योगदान आणि आजच्या पिढीसाठी साहित्याची उपयुक्तता यावर प्रभावी प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य प्रो. डॉ. एस.के. खाडे होते. तर प्रमुख उपस्थिती प्रा. डी.के. यादव यांनी आपले विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
Advt


या कार्यक्रमाचे आयोजन हिंदी विभाग प्रमुख प्रा.निलेश जाधव यांनी केले होते. त्यांनीच प्रास्ताविक करून हिंदी भाषेचे महत्त्व आणि जागतिक पातळीवरील गरज यावर थोडक्यात भाष्य केले.

कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. अंजली उबाळे यांनी केले. तसेच सह-संयोजक म्हणून प्रा.अपर्णा कांबळे व प्रा. किशोरी टोनपे यांनी कार्यभार सांभाळला.
सुत्रसंचालनाची जबाबदारी प्रा. के.एस. टोनपे यांनी समर्थपणे पार पाडली, तर प्रा. ए.एस. कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले.
या हिंदी दिन कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग लाभला.

 प्रो. डॉ. सुपर्णा संसुद्धी यांचे स्वागत करताना प्रा.एस.के.खाडे
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा