कोल्हापूर शाही दसरा महोत्सवानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा
इचलकरंजी
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांचेकडील दि.११ सप्टेंबर च्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त झालेला आहे.
या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूर शाही दसरा महोत्सव २०२५ अंतर्गत दिनांक २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या अंतर्गत आज मंगळवार दि.२३ सप्टेंबर रोजी कोल्हापुरी संस्कृती परंपरा व पारंपारिक वेशभूषा दिवस कोल्हापुरी चप्पल बाबत प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमाचे संपूर्ण जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे.
Advt
यानुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज पारंपारिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार,उपायुक्त राहुल मर्ढेकर,उपायुक्त विद्या कदम, मुख्य लेखा वित्त अधिकारी विकास कोळपे, सहा आयुक्त विजय राजापुरे यांचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेली होती.
पारंपरिक वेशभूषेत महापालिका अधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







