रोटरी क्लब इचलकरंजी व पोलीस दल आयोजित गणराया अवार्ड २०२५ चे उत्साहात वितरण
इचलकरंजी :-
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व पोलीस दल इचलकरंजी आयोजित प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेश मंडळ व घरगुती गणेश भक्त यांना प्रोत्साहन देण्याकरिता गणराया अवॉर्ड 2025 चे वितरण उत्साहात पार पडले. सदरचा कार्यक्रम पाहुणे मा. श्री अण्णासाहेब जाधव सर (अप्पर पोलीस अधीक्षक), यांच्या शुभ हस्ते तसेच मा. श्री विक्रांत जाधवसो (डीवायएसपी) व रोटरीचे उपप्रांतपाल सुदर्शन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या हॉलमध्ये पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डायरेक्टर शरद देसाई यांनी रोटरी फोर वे टेस्टचे चे वाचन केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय घायतिडक यांनी उपस्थितांचे स्वागत करून रोटरीच्या कार्याची माहिती दिली. कमिटी प्रोजेक्ट चेअरमन प्रकाश रावळ यांनी निवड प्रक्रियेचे सविस्तर विवेचन आपल्या प्रास्ताविकात केले. सार्वजनिक गणेश मंडळाचे व घरगुती गणेश भक्तांचे परीक्षण केलेल्या रोटरी सदस्यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव यांनी आपल्या प्रमुख भाषणामध्ये रोटरी क्लब नेहमीच समाजाच्या हिताचे कामे करीत असते. जागतिक स्तरावर समाजातील गरजू लोकांना कम्युनिटी सर्विस द्वारे छोट्या गावापासून मोठ्या भागात रोटरी चे कार्य विस्तारले आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला चांगला संदेश देणेकरीता सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती गणेश भक्तांना पारितोषिके देण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून रोटरीच्या कार्याचे कौतुक केले. गणेश मिरवणुकी वेळी डॉल्बी पासून नागरिकांचे कानाचे संरक्षण होण्याकरता कापूस बोळे वाटप करून सामाजिक उपक्रम राबविला तसेच डॉल्बी मुक्ती साठी ही जनजागृती करण्यात आली. यावेळी डीवायएसपी श्री विक्रांत गायकवाड व असिस्टंट गव्हर्नर सुदर्शन कदम यांचीही मनोगते झाली. आभार सेक्रेटरी राजू पाटील यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष तंगडी यांनी केले.
Advt
घरगुती गणेश अवॉर्ड पुढील प्रमाणे
उत्कृष्ट सजावट – प्रथम – अनिल श्रीधर हरणे, द्वितीय- तनया अतुल पाटील
तृतीय – आकाश अनिल शिरोळे , समाज प्रबोधन देखावा -प्रथम – किरण राजेंद्र काकडे , द्वितीय- श्री दत्तात्रेय गजानन इंदुलकर, तृतीय- अर्चित अभिजीत जोशी, उत्तेजनार्थ- प्रथम – योगेंद्र देवदास व्हनुगरे, द्वितीय – सुविधा विजय ठाणेकर, तृतीय- प्रमोद केरबा मोरे, उत्कृष्ट हालता देखावा – प्रथम -भालचंद्र पंढरीनाथ टाकवडे, द्वितीय – प्रियंका रोकडे, तृतीय – अक्षय दगडू लोले , उत्कृष्ट पौराणिक देखावा- प्रथम – विपुल प्रकाश खरबुडे, द्वितीय – आनंद शिवाजी कऱ्हाळे, तृतीय – निलेश नारायण तावरे. उत्कृष्ट ऐतिहासिक देखावा – प्रथम – रोहन संभाजी मोरबाळे, द्वितीय – दिगंबर वसंत रानभरे,
तृतीय – अनिकेत नंदकुमार मोरे, दिव्यांग विशेष पारितोषिक – किरण प्रकाश चावरे, संदीप बाळासो जाधव,
रोटरी परिवार पारितोषिक – प्रथम – पार्थ राजकुमार थोरवत, द्वितीय – रो. भरतकुमार राठी
तृतीय – अनुराधा प्रमोद धुत्रे
सार्वजनिक गणेश मंडळ अवॉर्ड पुढील प्रमाणे
उत्कृष्ट मूर्ती प्रथम- मंगळवार पेठ युवा मंच (पंत महाराजांच्या रूपात मूर्ती), द्वितीय – श्रीराम प्रतिष्ठान संचलित, शिवा ग्रुप गणेशोत्सव मंडळ (विष्णू अवतार, सोफ्यावर बसलेली पारंपारिक मूर्ती), तृतीय क्रमांक- शिवशंभो युवा मंच (बॅलेंसिंग रथातील मूर्ती), उत्तेजनार्थ -शहीद भगतसिंग गणेशोत्सव मंडळ (21 फुटी उत्कृष्ट मूर्ती).
समाज प्रबोधन देखावा प्रथम- श्री छत्रपती गणेशोत्सव मंडळ (योगासन मधील मूर्ती), द्वितीय- महालक्ष्मी सेवाभावी संस्था (पाश्चिमात्य व भारतीय संस्कृती या गोष्टीवर समाज प्रबोधन देखावा), तृतीय – जय हिंद गणेशोत्सव मंडळ (मुलांचे दप्तराचे ओझे, शैक्षणिक), कलात्मक देखावा -प्रथम- कलानगरचा महागणपती (गजमहल देखावा), द्वितीय- राष्ट्र ज्योत युवक मंडळ (वासुदेव रुपी गणेश मूर्ती), तृतीय – नवतारा तरुण मंडळ(चित्र काढत असताना उत्कृष्ट कलात्मक मूर्ती)
उत्कृष्ट हलता देखावा -प्रथम- श्री लक्ष्मी को ऑप प्रोसेस (भारतीय शस्त्र दल देखावा), द्वितीय- श्रम साफल्य सार्वजनिक उत्सव मंडळ (बाळूमामांचा दरबार हलता देखावा), तृतीय-. आप्पाजी सुर्वे नगर गणेशोत्सव मंडळ (विष्णू वराह अवतार देखावा), उत्तेजनार्थ- विश्वशांती गणेशोत्सव मंडळ (संत गोरा कुंभार आलता देखावा)
ऐतिहासिक देखावा -प्रथम -हत्ती चौक गणेशोत्सव मंडळ, हत्ती चौक, (छावा-सजीव देखावा) द्वितीय -गांधी कॅम्प तरुण मंडळ, (शिवराय रूपातील मूर्ती), पौराणिक देखावा – प्रथम – श्री वीरशैव लिंगराज युवक मंडळ (गणेश पुराण देखावा), विशेष पुरस्कार पर्यावरण पूरक- श्री बिरदेव वाचनालय गणेशोत्सव मंडळ (वन्यजीव संरक्षण, जंगलतोड) जनजागृती- न्यू गणेश तरुण मंडळ (जनजागृती देखावा)
कार्यक्रमावेळी रोटरीचे प्रकाश गौड, वसंत पाटील, महेंद्र मुथा, महादेव खारगे, सत्यनारायण धूत, शिवदास कित्तुरे, सागर पाटील, प्रमोद धुत्रे, सुनील यळरूटे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, घरगुती गणेश भक्तांचे कुटुंबीय, रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
रोटरी क्लब व पोलीस दल इचलकरंजी आयोजित गणराया अवॉर्ड वितरण कार्यक्रम प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव, डीवायएस पी श्री. विक्रांत गायकवाड,रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय घायतिडक, सेक्रेटरी राजू पाटील, सुदर्शन कदम, प्रकाश रावळ, शरद देसाई
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







