ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेची करदात्यांसाठी सुवर्णसंधी – मालमत्ता करावरील शास्ती अभय योजना जाहीर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेची करदात्यांसाठी सुवर्णसंधी – मालमत्ता करावरील शास्ती अभय योजना जाहीर

इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत शहरातील करदात्यांसाठी एक विशेष सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. “मालमत्ता कर शास्ती (दंड/व्याज) अभय योजना” अंतर्गत थकबाकीदारांना एकरकमी रक्कम भरून मोठ्या प्रमाणात सवलत मिळणार आहे. योजनेनुसार ११ ऑक्टोबर २०२५ ते २७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दंड/व्याजावर सूट मिळणार आहे. ११ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान कर भरणाऱ्यांना ९०% सवलत मिळेल, तर १६ ऑक्टोबर ते ०३ नोव्हेंबर या कालावधीत कर भरल्यास ७५% सवलत मिळणार आहे. पुढे ०४ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान कर भरणाऱ्यांना ५०% सवलत आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजे १९ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या दरम्यान कर भरल्यास २५% सवलत मिळेल.

महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील तसेच प्रभाग समिती कार्यालयातील कर संकलन केंद्रावर सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायं. ५ या वेळेत कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://ichalkaranjimnp.in ऑनलाइन भरणाही करता येईल.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी शहरातील सर्व मालमत्ता धारकांना आवाहन केले असून, “ही एक वेळची सुवर्णसंधी असून कर थकबाकीदारांनी दिलेल्या मुदतीत कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा