इचलकरंजीत विजयादशमीला दुर्गामाता दौडीचा समारोप
इचलकरंजी:
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने नवरात्रोत्सव काळात सुरू झालेल्या दुर्गामाता दौडीचा समारोप विजयादशमीच्या दिवशी गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पहाटे साडेपाच वाजता कॉ. के. एल. मलाबादे चौकात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारोप सोहळा पार पडणार असून नागरिकांनी व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गजानन महाजन गुरुजी आणि कार्यवाह प्रसाद जाधव यांनी केले आहे.
घटस्थापनेपासून दररोज सकाळी काढण्यात आलेल्या या दौडीत शेकडो युवकांनी भगवा फेटा, पांढरी टोपी घालून आणि भगवा ध्वज, शस्त्र हातात घेऊन दुर्गामाता व भारतमातेच्या जयघोषात सहभाग नोंदविला. भागभागात, मंदिरांमध्ये आरत्या, रांगोळी व फुलवर्षावातून दौडीचे स्वागत करण्यात आले. तरुणांमध्ये देशभक्ती, लढाऊपणा आणि एकात्मतेची भावना जागविण्याचा संदेश या दौडीतून देण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही इचलकरंजीत ही दौड उत्साहात पार पडली असून विजयादशमीच्या दिवशी होणारा समारोप सोहळा हा शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रमुख आकर्षण ठरणार आहे. तरी यासाठी धारकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







