ICHMH51NEWS.IN
9921600800

माहिती अधिकार दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेत कार्यशाळा संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती अधिकार दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेत कार्यशाळा संपन्न

इचलकरंजी (प्रतिनिधी) :
दि. २८ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या माहिती अधिकार दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेत माहिती अधिकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सोमवार, दि. २९ सप्टेंबर रोजी महानगरपालिका सभागृहात झालेल्या या कार्यशाळेचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यशाळेत महानगरपालिकेचे उपायुक्त नंदू परळकर यांनी माहिती अधिकार अधिनियम हा लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वाचा घटक असल्याचे प्रतिपादन केले. तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे यांनी माहिती अधिकाराबाबत सविस्तर मार्गदर्शन करून नागरिक आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहा.आयुक्त विजय राजापुरे यांनी केले. कार्यशाळेचे आयोजन सामान्य प्रशासन विभागाचे माहिती अधिकारी अजय जाधव यांनी केले.

याप्रसंगी शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, मिळकत व्यवस्थापक श्रीकांत पाटील, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, महिला बाल कल्याण अधिकारी बेबी नदाफ, क्रीडा अधिकारी संजय शेटे, उप लेखापाल रामचंद्र कांबळे, भांडार अधिक्षक सुजाता दाभोळे, कर अधिक्षक दिपक खोत, गणेश शिंदे, अनिस पठाण, प्रशांत आरगे, विधी अधिकारी ॲड. भावना देवडा, विद्युत अभियंता इसरार बेग, उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर यांच्यासह महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थिताना मार्गदर्शन करताना नंदू परळकर, समोर उपस्थित अधिकारी वर्ग

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा