भारतीय जनता पार्टी च्या वतीने सेवा पंधरवडा उत्साहात साजरा
इचलकरंजी ता.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या सेवा पंधरवड्यामध्ये समाजासाठी विविध उपक्रम राबवून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या सेवा पंधरवड्यामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी देशातील तमाम नागरिकांसाठी ज्या योजना राबवल्या त्याची माहिती देण्यात आली व शॉर्ट फिल्म द्वारे त्यांचा जीवनपट दाखवण्यात आला. त्याचबरोबर एक पेड मां के नाम या अंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले तसेच लोकांचे आरोग्य चांगले राहावे व शासनाच्या आरोग्याच्या विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देण्यासाठी व्याख्यान व समाजात चिकाटी व परिश्रमाने अभ्यास करून पुढे गेलेल्या तरुणांचा सत्कार व नवरात्रीच्या अनुषंगाने समाजातील अनेक महिला उत्कृष्ट कार्य करत असतात त्यातील नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी लक्ष्मी ज्योती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन अनेक सेवा उपयोगी कार्डांचे वाटप करण्यात आले, तसेच शहरातील विविध भागांमध्ये बुथ स्तरावर मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले व त्यांची जयंती साजरी करण्यात आली.
Advt
या सेवा पंधरवडाच्या कार्यक्रमांमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर माजी मंत्री प्रकाशराव आवाडे आमदार डॉ.राहुल आवाडे पूर्व भाजपा मंडलचे अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम भाजपा मंडलचे अध्यक्ष शशिकांत मोहिते ग्रामीण भाजपा मंडलचे अध्यक्ष बाळासाहेब माने सर्व मंडलाचे सरचिटणीस रविंद्र जावळे, अनिकेत पाटील, शिवानंद रावळ, महेश पाटील संयोजक सौ.सीमा कमते,अरुण कुंभार, राजू पुजारी, अभय बाबेल सहसंयोजक, मीडिया प्रमुख माधव उपाध्याय, सिद्धार्थ पुजारी, पश्चिम महिला अध्यक्षा सौ.सपना भिसे, उत्तम विभूते, श्री.संजय गंथडे, श्री.संजय गेजगे, प्रकाश खारगे, नागेश पाटील, उमेश चोपडे, संजय केंगार, मारुती पाथरवट, मंगल सुर्वे, नजमा शेख, अनिकेत पाटील, राहुल घाट, अमर कांबळे, सागर कचरे, सचिन कोरे, राजेंद्र दरीबे, सचिन परिट, विकास चौगुले, सचिन पवार, संजय केंगार शिवानंद रावळ, उमाकांत दाभोळे, मनोज साळुंखे, डॉ.पांडुरंग पिळणकर, मनोज हिंगमिरे, दीपक पाटील, संतोष शेळके नागेश पाटील, तात्या कुंभोजे, सौ.अर्चना कुडचे, वैभव पोवार, मनोज जाधव, सुहास पाटील, शीतल पाटील, शैलेश गोरे, सचिन कोरे, सौ.अश्विनी कुबडगे, हेमंत वरुटे, राहुल गाट दतात्रय मांजरे, विजय जासूद शिवानंद रावळ, सौ.रंजना डावरे, यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष. शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते व पक्षावर प्रेम करणारे नागरिक व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. 
फोटो-सेवा पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले,त्यावेळी सन्मान करताना मा आ.सुरेशराव हाळवणकर, श्रीरंग खवरे,शशिकांत मोहिते व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







