ICHMH51NEWS.IN
9921600800

दसरा महोत्सवानिमित्त इचलकरंजीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबद्ध पथसंचलन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दसरा महोत्सवानिमित्त इचलकरंजीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबद्ध पथसंचलन

इचलकरंजी:
दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी पथसंचलन पार पडले. शहरातील चार प्रमुख नगरांमधून हे संचलन काढण्यात आले असून नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेले.
   दरवर्षीप्रमाणे यंदाही संघाच्या वतीने महादेवनगर, बालाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती शिवाजीनगर या चार नगरांतून संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. महादेवनगरातील संचलनाची सांगता नामदेव भवन मैदान येथे झाली. बालाजीनगर पथसंचलन ओंकारेश्वर मंदिर समोरील मैदानावरून सुरू होऊन सांगली रोड, एकता कॉलनी, तोरणा नगर मार्गे परत ओंकारेश्वर मंदिर येथे संपले.
   छत्रपती शिवाजीनगर संचलन श्री स्वामी समर्थ महाराज केंद्र (पंचवटी चित्रपटगृह शेजारी) येथून सुरू होऊन छत्रपती शाहू महाराज स्मारक, एसी कॉलेज, कबनूर चौक, दत्तनगर मार्गे गंगवाल टेक्स्टाईल येथे विकीर झाले. तर संभाजीनगर पथसंचलन राजमाता जिजाऊ क्रीडासंकुलातून सुरुवात होऊन मराठा चौक, डॉ. हेडगेवार चौक, महानगरपालिका, डेक्कन चौक, शिकलगार वस्ती मार्गे परत क्रीडासंकुल येथे सांगता झाली.
   संचलनाच्या प्रारंभी ध्वजपूजन आणि प्रार्थना करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पुढे भगवा ध्वज वाहक स्वयंसेवक, त्यामागे घोष पथक आणि त्यानंतर शिस्तबद्ध चालणारे स्वयंसेवक असा संचलनाचा दिमाखदार ताफा होता. मार्गावर विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्या, पुष्पवृष्टी आणि आतषबाजी करून स्वागत करण्यात आले.
   विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गा वाहिनी आणि भारतीय जनता पक्षासह अनेक सामाजिक संस्थांनीही या संचलनात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून रस्त्यांच्या दुतर्फा संचलन पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
   यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वयंसेवक गणवेशात सहभागी होत संघाच्या शिस्त आणि संस्कारांचे दर्शन घडवले. संचलनानंतर एकत्रीकरण स्थळी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
संचलनात सहभागी आ.राहुल आवाडे व संघ स्वयंसेवक
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा