ICHMH51NEWS.IN
9921600800

यंत्रमाग उद्योगावरील वाढीव वीजदर रद्द करावेत-महाविकास आघाडीची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

यंत्रमाग उद्योगावरील वाढीव वीजदर रद्द करावेत-महाविकास आघाडीची मागणी

इचलकरंजी  :
इचलकरंजी महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने यंत्रमाग उद्योगावरील वाढीव वीजदर रद्द करावेत आणि पूर्वीप्रमाणे वीज सवलत लागू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी दिपक शिंदें यांना निवेदन देण्यात आले.
महाविकास आघाडीचे नेते शशांक बावचकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, “महाराष्ट्र शासनाने काही महिन्यांपूर्वी अडचणीत असलेल्या यंत्रमाग उद्योगास २७ अश्वशक्ती खालील आणि २७ अश्वशक्ती वरील वीजग्राहकांना अनुक्रमे १  रुपये आणि ७५ पैसे प्रति युनिट अनुदान जाहीर केले होते. मात्र,वीज नियामक आयोगाने या निर्णयास स्थगिती देऊन २५ जून २०२५ रोजी नवीन आदेश जारी केला आहे. त्यानुसार १ जुलैपासून आलेली वाढीव वीज बिले यंत्रमाग उद्योगासाठी घातक ठरत आहेत.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, “या वाढीव वीजबिलांमुळे उद्योगावर प्रचंड आर्थिक ताण येत असून मागणी शुल्क, ऊर्जा शुल्क, वहन आकार, व्हिलींग चार्जेस यामध्ये वाढ करण्यात आली आहे. आधीच अडचणीत असलेल्या यंत्रमाग व्यवसायावर ही वाढ झाल्यास संपूर्ण उद्योग मोडकळीत निघण्याची भीती आहे. शासनाने तातडीने बैठक घेऊन वाढीव वीजदर रद्द करावेत, अन्यथा महाविकास आघाडीला तीव्र आंदोलन उभारावे लागेल.”
Advt
या वेळी रणजित जाधव,प्रकाश मोरबाळे,सागर चाळके,सयाजी चव्हाण,उदयसिंग पाटील,राहुल खंजिरे,मलकारी लवटे,कॉ.सुनिल बारवाडे,वसंत कोरवी,रावसाहेब निर्मळे,शशिकांत देसाई,अभिजीत पुजारी, युवराज शिंगाडे,संभाजी सुर्यवंशी,रवी गोंदकर ययांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनाची प्रत शासनाकडे पाठवण्यात आली असून महाविकास आघाडीने इशारा दिला आहे की शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल.
वीजदरवाढ रद्द करणेसाठी निवेदन देताना महाविकास आघाडीचे पदाधिकारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा