सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा महाविकास आघाडी व मित्र पक्षांकडून तीव्र निषेध.
भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा महाविकास आघाडी व मित्र पक्ष, इचलकरंजी तर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. या घटनेमुळे देशातील लोकशाही मूल्ये व न्यायसंस्थेच्या स्वातंत्र्यावर आघात झाल्याचे आघाडीने नमूद केले असून, दोषींवर तातडीने कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निषेध व्यक्त करताना महाविकास आघाडीचे नेते शशांक बावचकर म्हणाले, “सरन्यायाधीश हे देशाच्या न्यायसंस्थेचे सर्वोच्च प्रतीक आहेत. त्यांच्यावर हल्ला होणे म्हणजे संपूर्ण न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न आहे. लोकशाहीवरील हा हल्ला असह्य असून, आम्ही तो कदापि सहन करणार नाही.”
या निषेध सभेत कॉ. सुनील बारवाडे, रणजित जाधव, प्रकाश मोरबाळे, सागर चाळके, सयाजी चव्हाण, उदयसिंग पाटील, राहुल खंजिरे, मलकारी लवटे, वसंत कोरवी, रावसाहेब निर्मळे, शशिकांत देसाई, अभिजीत पुजारी, युवराज शिंगाडे, संभाजी सूर्यवंशी, रवी गोंदकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा महाविकास आघाडीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







