ICHMH51NEWS.IN
9921600800

दिवाळी निमित्त इचलकरंजी आगारातून जादा एस.टी. फेऱ्यांचे नियोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दिवाळी निमित्त इचलकरंजी आगारातून जादा एस.टी. फेऱ्यांचे नियोजन

इचलकरंजी :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगारामार्फत दिवाळी २०२५ निमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून मुंबई, पुणे, सोलापूर, बार्शी, लातूर, गणपतीपुळे आदी प्रमुख मार्गांसाठी अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

इचलकरंजीहून मुंबई, बोरिवली (ठाणेमार्गे), लातूर, पुणे, सोलापूर, बार्शी, अक्कलकोट आणि गणपतीपुळे या मार्गांवर विशेष जादा फेऱ्या सोडल्या जाणार असून या सर्व फेऱ्या ऑनलाईन आरक्षणासाठी आणि एमएसआरटीसी मोबाईल अॅपद्वारे बुकिंगसाठी उपलब्ध आहेत.

याशिवाय इचलकरंजी–मिरज, सांगली, वडगाव आणि कोल्हापूर या स्थानिक मार्गांवरही प्रवासी गर्दीनुसार अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येतील. सर्व प्रवाशांसाठी, विशेषतः महिला, जेष्ठ नागरिक आणि अमृत जेष्ठ नागरिक यांना नियमित दरातील सवलतींचा लाभ देण्यात येणार आहे.

आगार प्रशासनाने दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करून प्रवास नियोजन करावे, असे आवाहन आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी केले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा