पांडुरंग म्हातुकडे यांचे निधन
इचलकरंजी –
भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर जिल्हा (पूर्व) ज्येष्ठ कार्यकर्ता प्रकोष्ट जिल्हाध्यक्ष पांडुरंग म्हातुकडे (वय 83) यांचे नुकतेच निधन झाले.
जनसंघापासून भारतीय जनता पार्टीपर्यंत निष्ठेने कार्य करणारे निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजप परिवारात शोककळा पसरली आहे. म्हातुकडे यांनी अखेरपर्यंत पक्षासाठी नि:स्वार्थ भावनेने सेवा केली. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी 8.30 वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







