ICHMH51NEWS.IN
9921600800

भाजपा महिला मोर्चा इचलकरंजी शहर पूर्व, पश्‍चिम मंडल कार्यकारीणी जाहीर..  

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भाजपा महिला मोर्चा इचलकरंजी शहर पूर्व, पश्‍चिम मंडल कार्यकारीणी जाहीर..

इचलकरंजी –

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील पूर्व मंडल, पश्‍चिम मंडल यांची कार्यकारीणी पूर्व मंडल अध्यक्षा सौ.सीमा कमते, पश्‍चिम मंडल अध्यक्षा सौ.सपना भिसे यांनी जाहीर केली. यामध्ये समाजातील सर्व घटकांमध्ये काम करणाऱ्या महिलांना कार्यकारणीमध्ये समावेश करून निवडी जाहीर करण्यात आल्या.

पक्षाचे काम निष्ठेने करणार्‍या महिला कार्यकर्त्यांनाच पदे देण्याचा भाजपामध्ये नियम आहे. या नियमावलीला अधीन राहून आमदार राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर मंडलाची कार्यकारणी जाहीर करीत असल्याचे सौ.सीमा कमते, सौ.सपना भिसे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Advt

 

यामध्ये पूर्व मंडल महिला मोर्चा  सरचिटणीस पदी संजिवनी पाटील, सविता जगताप, उपाध्यक्ष पदी सरला घोरपडे, गिरीजा हेरवाडे, जयश्री शेलार, वर्षा कांबळे, संगिता तुरंबेकर, रुपाली कुचेकर, निर्मला मोरे, अनुराधा शेरखाने, भारती पाटील, शोभा भाट, चिटणीस पदी सीमा वाघ, संगीता हुग्गे, विद्या लवटे, निर्मला कुरुंदवाडे, पुजा भिलुगडे, सुरेखा लोखंडे, प्रियंका पोटे, शितल सुर्यवंशी, सुप्रिया मजले, ज्योती लाटणे, कोषाध्यक्ष पदी मेघा भाटले यांची निवड करण्यात आली आहे.

त्याचबरोबर इचलकरंजी पश्चिम मंडल महिला मोर्चा  सरचिटणीस दिपाली कपिल लोटे, सुप्रिया जयदीप शिंदे, उपाध्यक्ष अरुणा दिलीप माने, शोभा विजय कापसे, अंजुम काशीम मुल्या, छाया बाळासाहेब तोडकर, अमिता भाऊराव बिरंजे, पुजा अतुल शिंदे, मानसी शेटके, योगीता उमाकांत दाभोळे, वंदना अनिल खामकर, चिटणीस सौ.संगीता घोरपडे, सविता सचिन माने, संध्या महादेव लायकर, मायेरा शोएबअख्तर इनामदार, माधवी मुंडे, सारिका भगवान सोनावळे, विद्या प्रकाश सुतार, कोषाध्यक्ष अर्चना उदय रावळ यांची निवड करण्यात आली.

 

सदर निवडीसाठी पूर्व मंडल शहराध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम मंडल शहराध्यक्ष शशिकांत मोहिते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा