ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची ‘वेस्ट टू बेस्ट’ संकल्पना; पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम 🪔🌿

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची ‘वेस्ट टू बेस्ट’ संकल्पना; पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम 🪔🌿

इचलकरंजी :

सणासुदीच्या काळात निर्माल्यामुळे पर्यावरणावर होणारा ताण कमी करण्यासाठी डिकेटीईच्या विद्यार्थ्यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एक उपक्रम राबवला आहे. ‘वेस्ट टू बेस्ट’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी निर्माल्यापासून धूप, उदबत्ती, रांगोळी, साबण, तेल, आकाशकंदील, कापूस वाती व शोभेच्या वस्तू तयार करून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

दिवाळी सणात बाजारात मिळणाऱ्या वस्तूंमध्ये रासायनिक घटकांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, ज्यामुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी मंदिरांमध्ये जमा होणारे फुलांचे निर्माल्य आणि नैसर्गिक साहित्य वापरून विविध वस्तू तयार केल्या आहेत. यामध्ये धूप-उदबत्तीचा सुगंध टिकाऊ असून साबणामध्ये कोरफड, लिंबाचा पाला आणि सुगंधी उटणे वापरल्याने त्वचेसाठी ते उपयुक्त ठरणार आहेत.

रांगोळीचे रंग हे नैसर्गिक असून घराच्या अंगणाची शोभा वाढवणारे आहेत. जुन्या साड्यांपासून देवाचे आसन, कापसाच्या फायबरपासून पौते, वाती आणि देवदागिने तयार करण्यात आले आहेत. या सर्व वस्तू कमी खर्चात व घरच्या घरी बनविता येतात. तसेच या वस्तू पारंपरिक, स्वदेशी आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होऊ शकतात.

या उपक्रमात मृणाल पाटील, पूजा पाटील, श्रेया पाटील, अनुषा रायबागी, झिनत गैबान, सानिका तवटे, आदिती धुमाळ, रुकया शेख, अनुज लुगडे, श्रेया भोसले, अश्विनी परिट, सानिका सावेकर आणि सार्थक जगताप या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व विश्वस्त मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मार्गदर्शन प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, प्रा. डॉ. यू. जे. पाटील, डॉ. ए. के. घाटगे, प्रा. डॉ. व्ही. डी. शिंदे, प्रा. सुयोग रायजाधव, प्रा. दिग्वीजय म्हामणे व इतर प्राध्यापक यांनी केले.

फोटो-डीकेटीईमध्ये ‘वेस्ट टू बेस्ट’ थीमखाली बनविलेल्या दिवाळी साहित्यांसोबत उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, डॉ. सपना आवाडे, मार्गदर्शक प्राध्यापक व विद्यार्थी.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा