डी.के.ए.एस.सी. कॉलेज च्या खो-खो संघाची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी
13 व 14 ऑक्टो 2025 रोजी कर्मवीर हीरे कॉलेज, गारगोटी येथे संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभागीय खो-खो महिला स्पर्धेत डी.के.ए.एस.सी. कॉलेजने उत्कृष्ठ कामगीरी करत चतुर्थ कमांक पटकावले. आणि 28 व 29 ऑक्टो. 2025 रोजी होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी हा संघ पात्र ठरला आहे. संघासाठी सरगम पोवार, समृद्धी निकम, श्रेया खामकर, गौरी लायकर, अर्पिता डोईफोडे, अश्विनी लोखंडे, दिक्षा हणबर, उत्कर्षा आरगे, प्रेरणा मोरडे, करुणा यादव, रीया भोसले, कोमल कांबळे, सौंदर्या चौगुले उत्कृष्ठ कामगीरी केली.
Advt
या सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के. खाडे यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. मुजफ्फर लगीवाले व प्रा. विनायक भोई यांचे मार्गदर्शन लाभले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







