शिवराज प्रतिष्ठानला राज्यस्तरीय सेवा गौरव पुरस्कार प्रदान
इचलकरंजी : प्रतिनिधी
पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल
इचलकरंजी येथील शिवराज प्रतिष्ठानला राज्यस्तरीय सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिष्ठानचे प्रताप भोई , मधुसूदन भोई यांनी स्विकारला.
Advt
इचलकरंजी येथील शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने गड किल्ल्यांची मोहीम,
स्वच्छता व संवर्धन ,मुलांना लाठीकाठी – दांडपट्ट्याचे प्रशिक्षण , किल्ल्यांच्या स्पर्धा अशा माध्यमातून नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम जागृत ठेवून प्रेरणा देण्याचे काम सुरु ठेवले आहे.या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या वतीने शिवराज प्रतिष्ठानचे प्रताप भोई , मधुसूदन भोई यांना विविध मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी तसेच विविध मान्यवर ,मंडळाचे पदाधिकारी ,सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल शिवराज प्रतिष्ठानचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
शिवराज प्रतिष्ठानचे प्रताप भोई व मधुसूदन भोई यांनी पुरस्कार स्वीकारला तो क्षण
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







