ICHMH51NEWS.IN
9921600800

व्यावसायिक स्पर्धेतून वाद — परस्परविरोधी तक्रारी दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

व्यावसायिक स्पर्धेतून वाद — परस्परविरोधी तक्रारी दाखल

इचलकरंजी (प्रतिनिधी)
शहरातील जवाहरनगर येथील फकीर मळा परिसरात बॉयलर इन्सुलेशन व्यवसायातील दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हाणामारी होऊन दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

तौसीफ अजीज इनामदार (वय 37, रा. इंदीरा कॉलनी, इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २४ ऑक्टोबर रोजी नातलगाच्या कार्यक्रमासाठी गेले असता, व्यवसायातील इर्षेमुळे आरोपी झाकीर हाशमी, रहमान हाशमी, रियाज पठाण, आब्नु हाशमी व युनुस हाशमी (रा. शहापूर) यांनी एकत्र येऊन सत्तुर, दगड व खुर्च्यांनी करून त्यांना मारहाण केली. यात त्यांच्या डोक्यासह शरीरावर दुखापत झाली. यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पो.हे.कॉ. रोटीवाले करीत आहेत.तर रुवेज अब्दुलरहमान हाशमी (वय २१, रा. फकीर मळा, जवाहरनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून त्यांनी म्हटले आहे की, व्यवसायातील इर्षेमुळे तौसीफ इनामदार यांनी त्यांच्या वडिलांवर अब्दुलरहमान मुस्तफा हाशमी (वय ४८) यांच्यावर सत्तुरने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. यावरून शिवाजीनगर पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे. जखमींवर उपचार निरामय (सेवासदन) हॉस्पिटल येथे सुरू आहेत.

या दोन्ही घटनेचा पुढील तपास सपोनि वायदंडे आणि पो.नि. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा