ICHMH51NEWS.IN
9921600800

महासत्ता चौक रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावणार – आमदार राहुल आवाडे यांची ग्वाही

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महासत्ता चौक रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावणार – आमदार राहुल आवाडे यांची ग्वाही

इचलकरंजी –
प्रदीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महासत्ता चौक परिसरातील रस्ता रुंदीकरण कामाच्या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कामातील अडचणी जाणून घेत आवश्यक त्या सूचना दिल्या असून, “हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल,” अशी ग्वाही दिली.

राजवाडा चौक ते महासत्ता चौक हा रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी व किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी रस्ता रुंदीकरणाचे काम दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. यापूर्वी महापालिकेच्या वतीने चौकातील काही अतिक्रमणे हटविण्यात आली असून, उर्वरित अतिक्रमणे काढण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रक्रिया सुरू आहे.

Advt

महासत्ता चौक परिसरात अनेक झाडे असल्याने रस्ता रुंदीकरण व सुशोभीकरणाच्या कामात काही अडचणी येत आहेत. याबाबत आमदार आवाडे यांनी प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून अनावश्यक झाडे काढावीत व कामाला गती द्यावी, अशा सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

रुंदीकरणानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, असा विश्वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केला.

या पाहणीवेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे अधिकारी, संजय केंगार, श्रेणीक मगदुम, राहुल घाट, सीमा कमते आदी उपस्थित होते.

पाहणी करताना आ.राहुल आवाडे,श्रेणीक मगदुम,राहुल घाट व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा