दैनंदिन बाजार फी, स्टॉल भाडे व मंडप फी वसुली आता महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून
आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांची माहिती
इचलकरंजी –
इचलकरंजी महानगरपालिका मार्केट विभागामार्फत सुरू असलेली दैनंदिन बाजार फी, स्टॉल भाडे, मंडप फी इत्यादी वसुली सध्या मक्ता पद्धतीने केली जात आहे. या वसुली कराराची मुदत रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजता संपत आहे.
या पार्श्वभूमीवर दि. ३ नोव्हेंबर २०२५ पासून पुढील ई-निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीत ही वसुली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील यांनी जाहीर केले आहे.
त्यानुसार दैनंदिन बाजारातील विक्रेते, व्यापारी, व्यावसायिक यांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करून फी वसुलीबाबत आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त सौ. पल्लवी पाटील यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







