ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत ट्रकच्या सहा बॅटऱ्यांची चोरी — ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत ट्रकच्या सहा बॅटऱ्यांची चोरी — ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास

इचलकरंजी :

— शहरातील जुन्या वैरण बाजार परिसरात उघड्यावर उभ्या असलेल्या ट्रकांमधून अज्ञात चोरट्याने तब्बल सहा बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विठ्ठल बलराम काकणके (वय ४७, रा. जुना चंदुर रोड, पुजारी मळा, इचलकरंजी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ते २ नोव्हेंबर सकाळी ७.३० या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या ट्रकांमधील बॅटऱ्या चोरीस केल्या. एक्साईड कंपनीच्या दोन आणि अॅमरॉन कंपनीच्या चार अशा एकूण सहा बॅटऱ्या, अंदाजे ४५ हजार रुपयांच्या किंमतीच्या, चोरट्याने लंपास केल्या आहेत.

या प्रकरणी पो.हे.कॉ. रोटीवाले यांनी गुन्हा दाखल केला असून तपास पो.ना. कांबळे करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा