भवानी कॉर्नर येथे मुंबई मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई — एकावर गुन्हा दाखल
इचलकरंजी :
शिवाजीनगर पोलिसांनी कबनूर ते फॅक्टरी रोडवरील भवानी कॉर्नर परिसरात मुंबई मटका जुगार खेळ चालविणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन पांडूरंग दैव (वय ५६, रा. बागडी गल्ली, कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हा आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी मुंबई मटका नावाचा जुगार खेळ चालवित होता. भवानी कॉर्नर येथे एका बंद पानपटीच्या खोक्याच्या आडोश्याला जुगार खेळ सुरू असताना पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम ७३० रुपये, दोन पांढऱ्या कागदाच्या स्लिपा, व एक बॉलपेन असा एकूण ७३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलीस हवालदार मनोहर यशवंत राऊत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल इंदुलकर पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







