ICHMH51NEWS.IN
9921600800

अल्पवयीन मुलीविरुद्ध अनुचित वर्तन प्रकरणी शहापुर पोलिसांत गुन्हा दाखल:

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अल्पवयीन मुलीविरुद्ध अनुचित वर्तन प्रकरणी शहापुर पोलिसांत गुन्हा दाखल

इचलकरंजी
शहापुर पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीसोबत अनुचित वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी बाबासाहेब बाणदार (रा. तोरणानगर सहारा निवारा कॉलनी, शहापुर, ता. हातकणंगले) याच्याविरुद्ध पोक्सो तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.शहापूर येथील तोरणानगर सहारा निवारा कॉलनीत आरोपीने दुकानात बोलावले आणि अनुचित वर्तन केले, असे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादींनी मुलीला विश्वासात घेऊन हकीगत जाणून घेतल्यानंतर २२ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १०.४१ वाजता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणात गुन्हा दाखल करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबल साबळे यांनी प्राथमिक कारवाई केली असून, तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, इचलकरंजी विभाग यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.
आमदारांसह भागातील नागरिकांचा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल..
गुन्हा दाखल करण्यास विलंब करून प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी संतप्त नागरिक व आमदार राहुल आवाडे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत हल्लाबोल केला,पो.नि. सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्याची मागणी करत २ दिवसात कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा