जीतो लेडीज विंग इचलकरंजी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.
इचलकरंजी
जीतो लेडीज विंग इचलकरंजी यांना गेल्यावर्षी घेतलेल्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी विविध राष्ट्रीय पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले
अहिंसा रन,खेळ पैठणीचा,चरण स्पर्श ,उड़ान शॉपिंग फेस्टिव्हल अशा बऱ्याच कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनामुळे हॉटेल ताज एक्सोटिका गोवा येथे आयोजित राष्ट्रीय बैठकीत चेअरमन सोनू जैन व सचिव विभा पाटणी यांना ४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संपुर्ण भारतातील ९ झोन मधील २०० महिला सहभागी झाल्या होत्या. या “समीक्षा” कार्यक्रमात में अपैक्स चेअरमन कांतिलाल ओसवाल मुंबई,जेएलडब्लू कन्वेनर संजय जैन कोलकत्ता,सुनीता बोहरा,लेडीज विंग नेशनल चेयरमन संगीता ललवानी ,मुख्य सचिव शीतल दुग्गड,आरओएम कन्वेनर वैशाली छाजेड यांच्या हस्ते इचलकरंजी जीतो लेडीज विंगला सन्मानित करण्यात आले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800