ICHMH51NEWS.IN
9921600800

पतीसह सासरच्या मंडळींकडून हुंडा मागणी आणि मानसिक छळ; गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पतीसह सासरच्या मंडळींकडून हुंडा मागणी आणि मानसिक छळ; गुन्हा दाखल

इचलकरंजी :

संभाजी चौक, इचलकरंजी येथील सौ. शारदा दिपक कुमावत (२५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिपक रामलाल कुमावत बुधकीदेवी रामलाल कुमावत रामलाल सुखाराम कुमावत  रा.बेरा नोकडा गाव, खिनावडी, राजस्थान, राकेश रामलाल कुमावत,तुलसीदास सुखाराम कुमावत,सुरेश नाथुराम कुमावत,रतनलाल कुमावत सर्व रा.साईबाबा नगर, बोराबंडा, हैद्राबाद यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या पती दिपक रामलाल कुमावत यांच्यासह सासू–सासरे, चुलत सासरे, दिर व इतर नातेवाईकांनी मे २०२१ पासून राजस्थानातील जैतारण तालुक्यातील बेरा नोकडा गाव तसेच हैद्राबाद येथील राहत्या घरामध्ये वेळोवेळी सोने व पैशाची सतत मागणी करत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे.

फिर्यादी व त्यांच्या आईवडिलांकडून वारंवार सोने व रोख रक्कम घेतल्यानंतरही आरोपींनी तिला योग्य वागणूक न देता शिवीगाळ, धमक्या देऊन घराबाहेर काढल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. ‘पैसे दिले नाहीत तर तुला व तुझ्या मुलाला संपवू’ अशी धमकी दिल्याचेही जबाबात म्हटले आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार वरक तपास करत असून पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा