‘शिक्षणायन’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १० डिसेंबरला
इचलकरंजी–
इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीतर्फे गुरुवर्य वा. गो. गोगटे लिखित ‘शिक्षणायन’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन बुधवार, १० डिसेंबर २०२५ रोजी व्यंकटराव हायस्कूल अॅण्ड जूनियर कॉलेजच्या पटांगणात दुपारी ४ वाजता होणार आहे. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. गो. सि. ढवळे भूषवणार असून आनंद हर्डीकर व भगतराम छाबडा प्रमुख पाहुणे असतील. ‘शिक्षणायन’ हे पुस्तक शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. सोहळ्यासाठी कार्यकारिणी सदस्य उत्साहाने तयारी करत असून साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







