सलीम रफिक शिकलगार यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चा कोल्हापूर पूर्व सरचिटणीस पदी नियुक्ती
इचलकरंजी
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा कोल्हापूर पूर्व सरचिटणीसपदी श्री सलीम रफिक शिकलगार यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून हार्दिक अभिनंदन व्यक्त केले जात आहे.
या नियुक्तीसाठी प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर व आमदार राहुल आवाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले. तसेच अशोकराव स्वामी आणि जिल्हाध्यक्ष औरंग शेख यांनीही श्री. शिकलगार यांचे अभिनंदन करून आगामी कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
श्री. सलीम शिकलगार यांची नियुक्ती झाल्यामुळे भाजप अल्पसंख्याक मोर्चा कोल्हापूर पूर्वच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







