ICHMH51NEWS.IN
9921600800

भरधाव मोटारसायकलमुळे अपघात; चार जखमी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भरधाव मोटारसायकलमुळे अपघात; चार जखमी

इचलकरंजी :
कोरोची–हातकणंगले मुख्य रस्त्यावर चव्हाणवाडी परिसरात भरधाव व बेदरकार मोटारसायकल चालविल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी सुनिल राजाराम खराडे (वय ५९, रा. गोकुळ चौक, आय.जी.एम. हॉस्पिटलजवळ, इचलकरंजी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी ते मित्र व्यंकटेश संजय मिरगे यांच्यासोबत सुझुकी अ‍ॅक्सिस (MH09-FE-0203) वरून नरंदेकडे जात असताना आरोपी महेश मोहन कोकणुरे (रा. कोरोची) याने स्प्लेंडर (KA-28-HC-1346) ही मोटारसायकल रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव चालवून समोरून जोराची धडक दिली.
या अपघातात फिर्यादी, व्यंकटेश मिरगे, आरोपी महेश कोकणुरे व सुनिल अशोक पांडव (रा. हातकणंगले) असे चौघे जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमींवर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी येथे उपचार सुरू आहेत. पुढील तपास पो.ना. वडगावे करत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा