श्री गजानन महाराज सर्व सेवा संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन संपन्न
खोतवाडी:
येथील श्री गजानन महाराज सर्व सेवा संस्थेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनी प्रसाद कुलकर्णी आणि सौदामिनी कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे प्रमुख दिलीप शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा दिमाखात संपन्न झाला. यावेळी प्रसाद कुलकर्णी व दिलीप शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले.पंच्याहत्तर फूट उंच संविधान स्तंभ व भारतमातेच्या भव्य मूर्तीसह ,मराठी संत व स्वातंत्र्य सैनिक यांच्या प्रतिमा आणि अमर जवान अभिवादन शिल्प यांनी साकारलेल्या या संस्थेच्या विशाल प्रांगणात झालेल्या या सोहळ्याला दिपश्री शेंडे,शंकर उडपी ,योगेश कौंदाडे ,सुहास शिंदे ,प्रकाश रावळ, आशुतोष पाटील, लक्ष्मण चौगुले , प्रत्यूष कुलकर्णी, प्रज्ञा कुलकर्णी ,सौरभ पाणदारे, प्रणाली पाणदारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गजानन महाराज मंदिर येथे प्रजासत्ताक दिनी घेतलेले छायाचित्र
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









