ICHMH51NEWS.IN
9921600800

घरफाळा व पाणीपट्टी थकबाकी त्वरित भरून जप्ती टाळण्याचे आयुक्तांचे आवाहन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

घरफाळा व पाणीपट्टी थकबाकी त्वरित भरून जप्ती टाळण्याचे आयुक्तांचे आवाहन

इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेच्या कर मूल्यनिर्धारण व संकलन विभागामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी घरफाळा व पाणीपट्टीची देयके शहरातील नागरिकांना वितरित करण्यात आली आहेत. मात्र अद्यापही अनेक मिळकतधारकांनी आपला घरफाळा व पाणीपट्टी भरणा केलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे संबंधित मिळकतधारकांनी आपली थकबाकी त्वरित भरावी, असे आवाहन इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. कर भरण्यासाठी महानगरपालिका मुख्य कार्यालयासह शहरातील चारही विभागीय कार्यालये कार्यालयीन वेळेत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. तसेच शनिवारी, कार्यालयीन सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
वेळीच कर भरणा करून जप्तीसारखा कटू प्रसंग टाळावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मा. आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा