आजारास कंटाळून आत्महत्या
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान परिसरात आजारास कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मयत सुनिल बाबुराव कांबळे (वय ५६, रा. शास्त्री सोसायटी, जवाहर नगर, इचलकरंजी) हे दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ६.१५ वाजण्याच्या दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानातील कंपाउंडजवळ मृतावस्थेत आढळून आले. त्यांना बी.पी. व शुगरचा दीर्घकालीन आजार होता. या आजारामुळे मानसिक तणावात त्यांनी नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







