रोटरी क्लब व डॉ. जे .जे. मगदूम हॉस्पिटल तर्फे होमिओपॅथिक शिबिर संपन्न
इचलकरंजी:
येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डॉ. जे.जे. मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज , हॉस्पिटल जयसिंगपूर यांच्या मोफत होमिओपॅथिक सर्व रोग तपासणी व उपचार शिबिर रोटरी सेवा केंद्र, दाते मळा इचलकरंजी येथे घेण्यात आले. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. या शिबिरात ७० रुग्णांची तपासणी करून मोफत होमिओपॅथिक औषधे देण्यात आले.
शिबिरा वेळी सर्व उपस्थित डॉक्टरांचेव उपस्थित यांचे स्वागत रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय घायतिडक यांनी केले. यावेळी रोटरीरीचे सेक्रेटरी राजू पाटील ,शरद देसाई, सत्यनारायण धूत, अभय यळरुटे ,राजाराम जाधव, उपस्थित होते .होमिओपॅथिक तज्ञ डॉ.आरती कोगणोळे व डॉ. प्रणव निमणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केवळ आजारावर उपचार करणे हे नसून आजार मुळापासून बरा करणे हाआहे. होमिओपॅथिक उपचार पद्धतीबद्दल महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे सामाजिक उपक्रम व होमिओपॅथिक औषधोपचार सर्वांगीण विकासासाठी कसे उपयुक्त आहेत याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले . प्रत्येक शुक्रवारी सकाळी 11 ते 1 यावेळी कायमस्वरूपी मोफत होमिओपॅथिक शिबिर सुरू राहील त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा असेही त्यांनी सांगितले. या शिबिरात डॉ. रोहन माळी, डॉ. अभिषेक मुळे , डॉ .ईशा पाटील, डॉ. निवेदिता पाटील, ईशा पाटील, डॉ. अंचल पाटील ,डॉ. मृणाल माळी ,डॉ. कौशल मोहिते, डॉ. प्रियांका पाटील ,डॉ. प्रतिक्षा फडके ,डॉ.स्वराली प्रयाग, डॉ. तृप्ती सोलवणे ,डॉ. ओम कुंभार व श्री. अमोल कांबळे यांनी रुग्णांची तपासणी केली. आभार सेक्रेटरी राजू पाटील यांनी मानले.
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व डॉ. जे .जे .मगदूम हॉस्पिटल जयसिंगपूर यांच्यावतीने मोफत होमिओपॅथिक शिबिरा वेळी तपासणी करताना डॉ. आरती कोगनोळे, डॉ. प्रणय निमकर, रोटरीचे अध्यक्ष संजय घायतिडक , सेक्रेटरी राजू पाटील, सत्यनारायण धूत, राजाराम जाधव, शरद देसाई ,
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







