श्री संत गजानन महाराज मंदिर प्रगट दिन उत्साहात संपन्न
इचलकरंजी
लोक भावनेतून साकारलेल्या मंदाताई नवरे यांच्या संत गजानन महाराज मंदिरात प्रगट दिन सोहळा निमित्त सकाळी सहा ते आठ नूतन नगरसेवक श्री.सौजय तेलनाडे परिवार यांच्या वतीने अभिषेक 9 ते 10 वा . सामुदायिक पारायण 10 ते 12 युवा कीर्तनकार ह. भ. प. दीपक बरगले महाराज यांचे कीर्तन झाले नंतर 12 वाजता सौ .पूजा संदेश पंतोजी यांच्या शुभहस्ते आरती होऊन दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत माजी मंत्री प्रकाश आवाडे ,श्री किरण दंडगे ,श्री अप्पासाहेब तांबे ,श्री डॉक्टर माने आदींचे हस्ते उपस्थित तीनशे तीन हजार भक्तांना महाप्रसादाचे वाटप झाले संध्याकाळी सहा ते सात वाजता पालखी सोहळा संपन्न झाला सायंकाळी सात वाजता पालखी होऊन कार्यक्रमाची सांगता झाली या कामी मंदिराचे किरण दडगे ,शरद पाध्ये ,भाहुसो पाटील, राजू हिरेमठ ,उमेश जाधव, अनिल धोत्रे, अशोक सुतार ,नितेश जाधव नागेश शेरीगार, सतीश कदम, चंदनसिंग रजपूत , विनायक तबिब,महिलांमध्ये प्रज्ञा शिंदे, विद्या सागोलेकर, राधिका कोथिंबरे , प्रती जाधव, वैशाली जाधव, माधुरी ढवळे, ऐश्वर्या तगारे आदींचे सहकार लाभले असे पत्रक मंदिराचे ही महेश गोमेवाडीकर यांनी प्रसिद्धीचे दिले आहे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







