रोटरी परिवार इचलकरंजी आयोजित नशा मुक्ती रॅलीस उस्फुर्त प्रतिसाद
इचलकरंजी :
येथील रोटरी परिवार इचलकरंजी च्या वतीने नशा मुक्ती प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले .या रॅलीचे उद्घाटन शाहू पुतळा येथे नवनिर्वाचित उपमहापौर श्री. अनिल डाळ्या यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीची सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी ‘दारूला नाही’- ‘जीवनाला होकार’ ,नशा सोडा- आरोग्य जोडा, ‘अमली पदार्थाची नशा -आयुष्याची होईल दुर्दशा ‘,सर्वांनी मिळून धरू हात- अमली पदार्थाचा करू पर्दाफाश ‘गांजा -चरस, एम-डी टाळा -‘जीवनाचा खरा गोडवा सांभाळा’ अशा आशयाचे संदेश देण्यात आले.
शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीतील सहभागी विद्यार्थ्यांनी हातात घेतलेले प्रबोधन पर फलक सर्वांचे लक्ष वेधत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या जयघोषाने मुख्य मार्ग दुमदुमून गेला ही रॅली शाहू पुतळा -शिवाजी पुतळा- जनता बँक- गांधी पुतळा मार्गे रोटरी सेवा केंद्र ,दाते मळा येथे समाप्त झाली.
समारोप कार्यक्रम रोटरी डिस्ट्रिक्ट 31 70 चे प्रांतपाल अरुण भंडारे व फर्स्ट लेडी सौ. माधवी भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या नशामुक्ती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या करीता पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला यातील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण व सहभागी शाळांना स्मृतिचिन्ह वितरण प्रमुख पाहुणे श्री व सौ भंडारे व असिस्टंट गव्हर्नर, रोटरीचे प्रेसिडेंट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी अँनस यांनी या रॅली करीता परिश्रम घेतले. या रॅलीचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्रोजेक्ट चेअरमन सो. मनाली मनीष मुनोत यांचा मानपत्र, शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
रोटरीचे प्रांतपाल भंडारे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी दशेपासून योग्य मार्गदर्शन झाले तर भावी पिढी या विळख्यात सापडणार नाही यासाठी म्हणून शालेय स्तरावरून जनजागृती केली जाणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत सावध होऊन व्यसनापासून दूर राहावे आणि नशा मुक्त भारत निर्माण करावे असे सांगितले. कार्यक्रमा वेळी सर्वांचे स्वागत रोटरीचे अध्यक्ष संजय घायतिडक यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मनाली मुनोत यांनी केले .आभार रोटरी अन्सच्या अध्यक्ष सौ .मेघा येळरूटे यांनी मानले .सूत्रसंचालन सौ. शुभांगी माळी यांनी केले. व्यासपीठावर पीडीजी महेंद्र मुथा ,उपप्रांतपाल गिरीश कुलकर्णी, पन्नालाल डाळ्या, घनश्याम सावलानी, संतोष साधले, योगेश मालू, निवेद ढाडानिया, प्रकाश लाहोटी, सौ. दीपा जठार, उपस्थित होते. रॅलीमध्ये विविध शाळेतून जवळजवळ 1000 विद्यार्थी, शिक्षक रोटरी परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने हजर होते. रॅलीवेळी विद्यार्थ्यांना पाणी बॉटल, बिस्किट ,गोळ्या व ब्रेकफास्ट देण्यात आला होता.
नशामुक्ती रॅली प्रसंगीचा क्षण
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







