ICHMH51NEWS.IN
9921600800

देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल करणारा अर्थसंकल्प – प्रा.संजय ठिगळे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल करणारा अर्थसंकल्प – प्रा. संजय ठिगळे

इचलकरंजी:
      इचलकरंजी येथील जयवंत महाविद्यालयात शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन व जयवंत महाविद्यालय इचलकरंजी सामंजस्य करारा अंतर्गत अर्थशास्त्र कॉमर्स विभागामार्फत केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ यावर शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक असोसिएशनचे नूतन अध्यक्ष प्रा. संजय ठिगळे यांनी शेती, ग्रामीण विकास, वाहतूक, पायाभूत सुखसुविधा, आरोग्य सक्षमीकरण यासारख्या मानवी जीवनाच्या मूलभूत घटकांवर विशेष लक्ष केंद्रित केले असल्याने हा अर्थसंकल्प देशाला सक्षम आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल करणारा, विकसित भारत म्हणून पुढे नेणारा असल्याचे मत वक्त्यांनी मांडले पण त्याची अंमलबजावणीही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. पाहुण्यांचा परिचय सहा. प्रा. सना कारीगर यांनी करुन दिला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. डॉ. एस. एस. पाटील यांनी केले. अर्थसंकल्प, अर्थसंकल्पातील तरतुदी, वित्तीय तूट, त्यातील धोरणे या बाबी विद्यार्थ्यांनी समजून घेण्याची गरज आहे आणि तोच या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलावर जमादार यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा संकल्पच न राहता तो प्रत्यक्षात सत्यात उतरवण्याची गरज असल्याचे मत मांडले. यावेळी सानिया पाटील, सानिया मुल्ला, आकांक्षा सुतार, योगेश्वरी कांबळे आणि अनुष्का सिंग यांनी अर्थसंकल्पावर मांडलेल्या  भित्तीपत्रकाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचीही चर्चा करण्यात आली. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे माननीय प्राचार्यांनी विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. प्रतीक्षा मलिकवाडे यांनी केले तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार सहा. प्रा. कोमल कांबळे यांनी मानले. यावेळी सुयेक उपाध्यक्ष डॉ. मनोहर कोरे, डॉ. ए. वाय. आवळे, सहा. प्रा. राकेश शेटके, सहा प्रा. उज्वला चौगुले, सहा. प्रा. वैशाली चौगुले, सहा. प्रा. देवकी जाधव यांच्यासह इतर बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना प्रा संजय ठिगळे

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा