ICHMH51NEWS.IN
9921600800

जन्मशताब्दी आणि  सुवर्ण महोत्सवही विविध उपक्रमानी साहाय्याने साजरा होणार…समाजवादी प्रबोधिनीच्या बैठकीतील निर्णय

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जन्मशताब्दी आणि  सुवर्ण महोत्सवही विविध उपक्रमानी साहाय्याने साजरा होणार…समाजवादी प्रबोधिनीच्या बैठकीतील निर्णय

इचलकरंजी ता.
समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस, थोर विचारवंत ,स्वातंत्र्य सैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांच्या जन्मशताब्दी प्रारंभदिनी समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित बैठकीमध्ये शांतारामबापू गरुड यांना प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक चौसाळकर होते. प्रारंभी प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी प्रास्ताविकातून प्रबोधिनीची आजवरची वाटचाल आणि पुढील दिशा याबाबतचे विवेचन केले.यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.व्ही.बी.आवटी आणि प्रा.जे.बी. शिंदे यांना आदरांजली वाहण्यात आली.आचार्य शांताराम गरुड यांचे अतिशय उत्तम चित्र साकारल्याबद्दल ज्येष्ठ चित्रकार रशीद मतवाल यांचा शाल व  ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. टी.एस. पाटील ,प्राचार्य आनंद मेणसे, डॉ. चिदानंद आवळेकर, अन्वर पटेल, प्रा. डॉ. काशिनाथ तनंगे,जयकुमार कोले, डॉ.व्ही.बी. ककडे, बी.एस. खामकर, ॲड.अजित सूर्यवंशी,डॉ .महावीर अक्कोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत आचार्य गरुड यांची जन्मशताब्दी आणि समाजवादी प्रबोधिनीचा सुवर्ण महोत्सव विविध उपक्रमांच्या साहाय्याने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या उपक्रमांना समाजातील सर्व घटकांनी साथ द्यावी असे आवाहनही करण्यात आले.

संविधानाचे नामवंत अभ्यासक ज्येष्ठ विचारवंत  प्रा. डॉ. भालबा विभूते यांनी यावेळी ” समाजवादी प्रबोधिनीच्या सुवर्ण महोत्सवा निमित्ताने एक संवाद ” या आशयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्यामध्ये मूलभूत तात्विक अधिष्ठान, लक्ष्यकेंद्रित पद्धतीने कार्य,  संघटन ,सुवर्ण महोत्सवी वर्षातील उपक्रम ,त्याचे नियोजन, निधी संकलनाचे मार्ग,प्रबोधन प्रकाशन ज्योती व प्रबोधन वाचनालय या उपक्रमांची व्यापकता, प्रबोधिनीच्या शाखांचे मजबुतीकरण,पंचवार्षिक नियोजन आदी मुद्द्यांच्या आधारे ही मांडणी केली. त्यावर सर्व सहभागी मंडळींनी सखोल स्वरूपाची चर्चाही केली.

अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्रा .डॉ.अशोक चौसाळकर म्हणाले, आचार्य शांताराम बापूंची जन्मशताब्दी सुरू झाली आहे.तसेच ११ मे २०२६ पासून “शास्त्रीय समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ” हे ब्रीद घेऊन महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीत सातत्यपूर्ण संस्थात्मक स्वरूपाचे काम करणारी ” समाजवादी प्रबोधिनी ” ही संस्था ५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. समाजवादी प्रबोधिनीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये ती सर्वार्थाने अधिक सक्षम व्हावी यासाठी आपण सर्वांनी व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर आगामी सव्वा वर्ष जोमाने प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. तसे प्रयत्न आपण सर्वजण मिळून करूया. या प्रयत्नांना समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे असे आवाहनही केले. यावेळी प्रा.संजय साठे, प्रा. शिवाजीराव होडगे, प्रा. शांताराम कांबळे, के.एस. दानवाडे, एफ.वाय.कुंभोजकर, समीर कटके, ॲड.संभाजीराव जाधव ,वाय.एम. चव्हाण ,उज्वला दळवी, उर्मिला कदम, सौदामिनी कुलकर्णी,प्राचार्य साताप्पा कांबळे, पांडुरंग पिसे, देवदत्त कुंभार ,शकील नदाफ ,तुकाराम अपराध, राजन मुठाणे, शिवाजी शिंदे, धुळगोंडा पाटील, बाळासाहेब कदम, नौशाद शेडबाळे, कविता डांगरे, मानसी तगारे यांच्यासह प्रबोधिनीच्या विविध शाखांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

शांताराम गरुड यांना अभिवादन करताना अशोक चौसाळकर,आनंद मेणसे, प्रसाद कुलकर्णी व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा