इचलकरंजी महानगरपालिकेचे करदात्यांना आवाहन : सुट्टीच्या दिवशीही करभरणा सुविधा
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिका यांच्या मूल्यनिर्धारण व कर संकलन विभागामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील घरफाळा व पाणीपट्टीची देयके मालमत्ता धारकांना पाठविण्यात आलेली आहेत.
तथापि, अद्याप काही मिळकत धारकांनी घरफाळा व पाणीपट्टीचा भरणा केलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधितांनी तात्काळ आपला मालमत्ता कर भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कर भरण्यासाठी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासह चारही विभागीय कार्यालये खालील तारखांना, कार्यालयीन सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत:
शनिवार, दि. २१ फेब्रुवारी २०२६
शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६
वेळ : सकाळी ९.४५ ते सायं. ५.००
महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी सर्व मिळकत धारकांनी घरफाळा व पाणीपट्टीची थकबाकी लवकरात लवकर भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे तसेच जप्तीसारखे कटू प्रसंग टाळावेत, असे आवाहन केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







