इचलकरंजी विधानसभा मतदार संघात १२ मतदान केंद्रे वाढली
इचलकरंजी : वार्ताहर
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ (२७९) येथील मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनर्रनिरीक्षण कार्यक्रम १ जुलैपासून राबविण्यात येत आहे. सध्या मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, याबाबत अंतिम मतदार यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्धीला येईल. अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी मोसमी बर्डे -चौगुले यांनी दिली.
या पुननिरीक्षण कार्यक्रमात ६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट पर्यंत प्रसिद्ध मतदार यादीतील नावे व हरकती घेणे. यामध्ये नव मतदार नोंदणी, मतदारांची वगळणी, मतदारांचा तपशील दुरुस्ती होणार आहे . तसेच विशेष मोहीम १० व ११ ऑगस्ट आणि १७ व १८ ऑगस्ट या दिवशी संपूर्ण दिवसभर मतदान केंद्रावर राबवली जाणार आहे. याबाबतची अंतिम मतदार यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.२२ जुलै २०२४ अखेर या मतदारसंघात पुरुष १ लाख ५४ हजार ७४७ पुरुष तर १ लाख ४७ हजार ५८१ महिला आणि इतर ६० असे एकूण ३ लाख २ हजार ३८८ मतदार आहेत. तर आज अखेर १८ ते १९ वयोगटातील मतदार संख्या ४४६९ आहेत. तसेच पुरुष गुणोत्तर प्रमाणामध्ये १००० पुरुषामागे ९५४ स्त्रिया मतदार आहेत.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात २५४ जुने मतदान केंद्र असून नव्याने १२ केंद्रे वाढले आहेत असे एकूण सध्या २६६ मतदान केंद्रे अस्तित्वात आलेली आहे. यामध्ये कोरोची १, खोतवाडी १, कबनूर २, चंदुर १, व इचलकरंजी ८ असे नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत.
निवडणूक आयोगाने हा मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रम निर्धारित केलेल्या कालावधीत सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर स्वतः समक्ष उपस्थित राहून हे कामकाज पूर्ण करणार आहेत.
मतदार नोंदणी मतदार वगळणी व यादीतील मतदारांचा तपशील दुरुस्तीसाठी शासनाच्या संकेतस्थळाचा वापर करून घरबसल्याही ही दुरुस्ती किंवा मतदार नोंदणी होऊ शकते. तसेच १ जुलै रोजी १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या युवकांनी मतदान नोंदणी करून मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहनही मतदान नोंदणी अधिकारी मोसमी चौगुले यांनी केले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800